कापडणे गाव (KAPADANE)


कापडणे हे खान्देशातील (महाराष्ट्र, भारत) धुळे जिल्ह्यात वसलेले एक गाव. सर्वाधिक स्वतंत्रता सेनानी असणारे गाव म्हणून कापडण्याची ख्याती आहे. भारतीय स्वतंत्रता संग्राम असो वा गोवा मुक्तीसंग्राम, येथील स्वातंत्र्यसैनिकांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य चळवळींमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.

गावाच्या नावाची व्युत्पत्ती: कापडणे-कर्पटिन (वारकरी, भिकारी) कर्पटिस्थानं (संदर्भ: 'स्थलनाम-व्युत्पत्ति कोश' - इतिहासाचार्य राजवाडे).

गावाच्या नावाचा 'कापडणा' (KAPADANA / KAPADNA) असा देखील नामोल्लेख केला जातो.

गावाचे नाव: कापडणे (KAPADANE / KAPADNE)
तालुका & जिल्हा: धुळे
राज्य: महाराष्ट्र
पिन कोड: ४२४ ३०७


  • स्थान:
    कापडणे हे राष्ट्रीय महामार्ग-३ जवळ स्थित आहे. हे राष्ट्रीय महामार्ग-३ पासून ३ किमी लांब आहे. देवभाने हे गाव राष्ट्रीय महामार्ग-३ आणि कापडणे यांना जोडणारा दुवा आहे.
  • वाहतूक सेवा:
    • रेल्वे:
      कापडण्याला रेल्वे स्थानक नाही, सर्वात जवळचे रेल्वे स्थानक गावापासून १५ किमी अंतरावर धुळे शहरात आहे.
    • रोड:
      महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) जोडला गेला आहे. बस आणि खाजगी प्रवासी वाहने कापडणे-देवभाने-धुळे दरम्यान प्रवाश्यांच्या दिमतीस हजर असतात.
    • हवाई:
      कापडण्याला विमानतळ नाही, सर्वाधिक जवळचे विमानतळ धुळे शहरात उपलब्ध आहे.
चालू घडामोडी

कापडणे गावाचा नावलौकिक पोचला सातासमुद्रापार!

--- अॅग्रोवन गुरुवार ११ जून, २०१५ (पान # ८)