६० वर्षात प्रथमच कापडण्यात माजी विदयार्थोंचा स्नेहमिलन व गुरूऋण सोहळा संपन्न:

धुळे तालूक्यातील कापडणे येथील श्री एच. एस. बोरसे हायस्कूल मधील s. s. c. (इ. १० वी ) १९९७ बॅच स्नेहमिलन व गुरूऋण सोहळा कार्यक्रम सोमवारी दि. १४/०५/२०१८ रोजी सकाळी १० वाजता एच. एस. बोरसे विदयालयाच्या प्रागंणात मोठया उत्साहाने संपन्न झाला .या कार्यक्रमाचे आयोजक, बोरसे विदयालयात १९९७ या वर्षाला इयत्ता १० वीच्या वर्गात शिक्षण घेणारे सर्व माजी विदयार्थी व विदयार्थीनींनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडवुन आणला आहे. s. s. c. १९९७ च्या बॅचचा स्नेहमिलन व गुरूऋण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे विदयमान प्राचार्य रविंद्र आत्माराम पाटील होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ साहीत्यीक रामदास विठ्ठल वाघ , चिंधु लोहार सर, बोरसे विदयालयाचे गुरुवर्य सेवानिवृत्त प्राचार्य डी. टी. जोशी, व्ही. डी. सुर्यवंशी, व्हि. यु. पाटील, व्हि. ए. देसले, पी. एन. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फूले व विदयेची आराध्य देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ साहीत्यीक रामदास वाघ ,प्राचार्य आर. ए. पाटील, चिंधू लोहार सर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सन १९५८ मध्ये बोरसे विदयालयाची स्थापना झाली होती तर आज तब्बल ६० वर्षानतंर प्रथमच १९९७ च्या १० वी च्या बॅचच्या माजी विदयार्थी व विदयार्थीनींनी पहिल्यादांच हा आगळा वेगळा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घडवुन आणला त्याबद्दल विदयालयातील आजी माजी प्राचार्य मुख्याध्यापक ,गुरुवर्य ,माजी विदयार्थी व विदयार्थींनींच्या कूटंबातील सदस्याच्या चेहऱ्यावर एक नाविन्यपुर्ण आनंद दिसुन येत होता. सर्वञ चेहरे हसरे गोजरे एकमेकांच्या गाठीभेटी घेणारे व एक दुसऱ्याची सुखदुखांची आदरतिथ्यांने विचारपुस करतांना दिसत होते. या बॅच मधील बहुतांशी जास्तीत जास्त विदयार्थी शासकीय नौकरीला लागले आहेत त्यात काही वरिष्ठ व कनिष्ठ महाविदयालयात प्राध्यापक,शिक्षक, आर्मि सैनिक, पोलीस दलात अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर ,व्यावसायायिक ,लोकनियूक्त सरपंच, सामाजिक राजकीय नेते आदी विविद पदांनवरती माजी विदयार्थी आपआपल्या सेवेत कार्यरत आहेत.

कार्यक्रमाचा उद्देश: स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय यासंदर्भात माजी विदयार्थी व शिक्षक मनोज अरूण पाटील यांनी सांगितले की मित्रांच्या गाठीभेटी प्रत्यक्षात घेणे,गुरुंची भेट व आर्शिर्वाद घेवुन त्यांच्याशी जुन्या व नव्या गोष्टींची हितगुज करणे यासंदर्भात मनोगत व्यक्त केले. १९९७ चा १० वीचा बॅचचाग्रुप सोशल ग्रूप अॅडमिन गोरख पाटील यांचाही याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून ,माजी विदयार्थी व सध्याचे धनूर लोणकूटे ग्रूप ग्रामपंचायत लोकनियूक्त सरपंच सुनिल रोहीदास शिंदे यांचा जाहीर सत्कार करून याप्रसंगी माजी विदयार्थी व विदयार्थीनींचा व त्यांच्या कुटूंबातील सर्व सदस्यांचा मान्यवरांनकडून गुलाब पुष्प देवुन सत्कार करण्यात आला तर कार्यक्रम आयोजक माजी विदयार्थी यांनी बोरसे विदयालयातील आजी माजी प्राचार्य ,मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,शिक्षक, शिक्षिकांचा ऋण व्यक्त करण्यासाठी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी जेष्ठ साहीत्यीक रामदास वाघ, माजी प्राचार्य डी. टी.जोशी, व्ही. डी. सुर्यवंशीं, व्हि. ए. देसले, पाठकसर, एस. व्ही पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले तर माजी विदयाथ्र्योंत शिक्षक मनोज अरूण पाटील, अमोल भगवंतराव बोरसे, रामकृष्ण पाटील, उमेश पाटील, पकंज पाटील, अविनाश पाटील, सुयोग पाटील, योगेश प्रल्हाद पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. बोरसे विदयालयाचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा सकंल्प याप्रंसगी १९९७ च्या १० वी च्या विदयार्थ्यांच्या वतीने मनोज पाटील, दिपक पाटील, संजय पाटील, अमोल बोरसे यांनी संभोधीत केले होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना माजी विदयार्थी डॉ. गणेश सर ,सुत्रसंचालन शिक्षक संजय रोहीदास पाटील,आभार प्रर्दशन शिक्षक दिपक सुर्यंवंशी यांनी केले कार्यक्रमास माजी विदयाथ्र्यांसह आजी माजी गुरुवर्य मोठया संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी १० वी च्या बॅचच्या वतीने बोरसे विदयालयाला छञपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक "जाणता राजा"चा सोहळयाची भव्य प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.व पुढील वर्षापासुन बॅचमधील प्रत्येक माजी विदयाथ्र्यांकडून शाळेच्या आवारात प्रत्येकी एक वृक्षारोपन करून त्याचे संगोपन करून झाडाला मोठे करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

फोटो:- १) एच. एस. बोरसे विदयालयातील s. s. c. १९९७ सालच्या माजी विदयार्थी व गुरुवर्य यांचा स्नेहमिलन व गुरुऋण सोहळ्यात मार्गदर्शन करतांना जेष्ठ साहीत्यीक रामदास वाघ, प्राचार्य आर्य पाटील ,चिंधू लोहार सर जोशी सर, सुर्यवंशी सर, देसले सर, प्रकाश पाटील, विजय पाटील आदी:

२) माजी विदयार्थ्यांकडून बोरसे विदयालयास प्राचार्य आर. ए. पाटील यांना शिवराज्यभिषेक प्रतिमा भेट: