कापडणे गाव

sthapana-1st-election

  • प्रकाश कन्स्ट्रक्शन:

    आमच्याकडे सेंट्रीग प्लेट भाड्याने मिळेल. संपर्क: श्री. विनोद (भैय्या) वसंत पाटील (भ्रमणध्वनी: ९०९६८५४९९२)
    अधिक वाचा...

    कापडणे येथील श्री. वसंत हिंमत पाटील यांनी १९८५ पासून बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला. बिगारी कामापासून सुरवात करून स्वत:च्या व्यवसाय उभारणीपर्यंत मजल मारली. म्हणूनच वसंतनाना पुढे वसंत कारागीर आणि वसंत ठेकेदार म्हणून ओळखले जाऊ लागले. १९८६ साली मित्र आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संचालक मंडळाच्या आग्रहास्तव गल्लितिलच जीर्ण झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्नोद्धारापासून सुरवात करून प्रकाश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून स्वतःच्या बांधकाम व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्यांनी धुळे जिल्ह्यातील नामांकित वास्तुविशारदांच्या देखरेखीखाली महाराष्ट्रभर कामे केली. नंतर त्यांनी बालब्रह्मचारी दामोधर महारांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी मंदिरांची उभारणी केली. बांधकाम व्यवसायात राहूनही ते दारूसारख्या व्यसनाच्या आहारी गेले नाहीत. त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली अनेक कुशल कारागीर घडविले, फक्त व्यावसाहिक दृष्टीकोन न ठेवता त्यांनी सोबत काम करत असलेल्या सहकारी मजुरांनाही दारूसारख्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले. काम करत असताना सर्व सहकाऱ्यांच्या परिवाराची ते जातीने काळजी घेत. आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहनही देत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे नानाविध क्षेत्रातील अनेक माणसे त्यांच्याशी जोडली गेली. प्रामाणिकपणा आणि कामावरच्या निष्ठेमुळे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. वारकरी संप्रदायाचे पायिक म्हणून त्यांनी बांधकाम व्यवसायात असूनही शुध्द आचरणाचे पालन करत एक आदर्श निर्माण केला आहे. पण शरीर अस्वास्थ्यामुळे त्यांना काम बंद करावे लागले. नंतर त्यांचे जेष्ठ सुपुत्र विनोद पाटील यांनीदेखील हा व्यवसाय पुढे चालू ठेवला. परंतु कालांतराने त्यांनीही शेतीकडे लक्ष केंद्रित केले.

  • आनंद पान सेंटर, कापडणे

    आनंद पान सेंटर: नवल गजमल भुजबळ – ९९७५३४२१२२, न्यु आनंद पान सेंटर: रतन गजमल भुजबळ - ९७६६७५७५२३
    अधिक वाचा...

    आनंद पान सेंटर, कापडणे म्हटले तर कापडण्याचे युनीक आयाडेंटीटी लोकेशन म्हटले तरी चालेल. उत्कृष्ट पान, बार व सेवा मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण असे संपूर्ण कापडणे वाशीयांचे व संबंधीतांचे दुकानाला दिलेले विशेषणच आहे.

    फक्त पान, बार या गोष्टींसाठीच नाही तर गेली ४० वर्ष गावात येणारे जाणारे लोक आपला सामान, पैसे शहरातून पार्सल म्हणून आलेला माल अतिशय विश्वासाने येथे ठेवतात. तसे म्हटले तर भवानी चौकातील (बस स्थानक) वरील विश्वासाचे हेच ठिकाण आहे असे नाही संपूर्ण चौकातील व्यावसायिक व ग्रामस्थ या विश्वासाचे पाईक आहेत लाख मोलाची वस्तू जरी या चौकात कोणी ठेवून गेले तरी ती गहाळ होणार नाही याची शाश्वती येथील लोकांना आहे.

    कापडणे गावातील सर्वात जुना पान व्यावसायिक म्हणून आनंद पान सेंटरची ओळख आहे. २६ जानेवारी १९७४ रोजी श्री. नवल गजमल भुजबळ व श्री. रतन गजमल भुजबळ या एका शेतमजुराच्या मुलांनी ठरवले कि प्रगतीपथावर असलेल्या कापडणे गावात एखादा व्यवसाय सुरु केल्यास आपली प्रगती होईल. अश्यातच त्यांनी पान दुकान सुरु करण्याचे ठरविले. जागा मिळाली ती भवानी चौक, वास्तविक भवानी चौक त्याकाळी फारसा व्यावसायिक परिसर नव्हता पण, तो भविष्यात होईल अशी आशा होती.

    सुरवातील ५ पैसे प्रती पान या दराने सुरवात केली, आज ५ रुपयापासून १० रु. प्रती पान असा दर आहे. ४० वर्षात इतर वस्तूंच्या तुलनेन हि भाववाढ फारशी नाही, हे सुध्दा येथील येथील वैशिष्ट आहे. शक्य तितक्या कमी भावात ग्राहकांना सेवा पुरवावी.

    ४० वर्षात विश्वासार्ह सेवा, आत्मीयता, नम्रपणा, आणि गुणवत्ता यांच्या जोरावर आपल्या संसारचे रूप पालटून टाकले आहे.

    आनंद पान सेंटर: नवल गजमल भुजबळ - ९९७५३४२१२२, बिपीन नवल भुजबळ - ९७६३३७२१०७

    न्यु आनंद पान सेंटर: रतन गजमल भुजबळ – ९७६६७५७५२३, संदीप रतन भुजबळ - ९९७५७७९२९३